धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय मॉडर्न पेंटाथलॉन महासंघ यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य मॉडर्न पेंटाथलॉन असोसिएशन यांच्या वतीने अहमदनगर येथील वाडिया पार्क स्टेडियम येथे दि 8 ते 9 जुलै दरम्यान झालेल्या 7 व्या राष्ट्रीय लेजर रन अजिंक्य पद स्पर्धा 2023 मध्ये धाराशिव जिल्ह्याने चांगले यश संपादन केले.  यावेळी विजयी खेळाडूंचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हा मॉडर्न पेंटाथलॉन संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पदक, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य संघात सहभागी असलेले धाराशिव जिल्ह्यातील योगिनी साळुंके - प्रथम क्रमांक (3 धावणे व शूटिंग, साईजित मेंगले - द्वितीय क्रमांक (900 मी धावणे व 10 मी शूटिंग), कु ज्योत्सना लईतबार - द्वितीय क्रमांक (3 धावणे व शूटिंग), कु अक्षता मते - द्वितीय क्रमांक (900 मी धावणे व शूटिंग), युगराज चव्हाण - तृतीय क्रमांक (900 मी धावणे व शूटिंग) यांनी घवघवीत यश संपादन केले. 

यावेळी जिल्हा मॉडर्न पेंटाथलॉन संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर (माऊली) भुतेकर, प्रशिक्षक योगेश थोरबोले, महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर,रामकृष्ण खडके, अनिल भोसले,प्रा शरद सावळे अजिंक्य वराळे, रामेश्वर मेंगले, सुरज ढेरे व संचालक मंडळाने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


 
Top