नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे मरगम्मा देवी यात्रेनिमित्त मरगम्मा समाजाच्या वतीने भरविण्यात आलेल्या सहा षटकाच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतीसाद मिळाला असुन दि. 13 जुलै रोजी या सर्धेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

नळदुर्ग शहरात मरगम्मा समाजाची वस्ती आहे. सध्या मरगम्मा देवीची यात्रा सुरू असुन या यात्रेनिमित्त मरगम्मा समाज बांधवांनी फक्त समाजातील खेळाडूंसाठी सहा मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे नळदुर्ग येथे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजयी संघाला तमन्ना सायप्पा कोळी यांच्याकडून 10 हजार रुपये रोख व चषक तर उपविजेत्या संघास भीमा बिगाप्पा कोळी यांच्याकडून  7 हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. दि. 13 जुलै रोजी शहरातील मरीआई ग्राउंडवर सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले यांच्या हस्ते व उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर व शहरप्रमुख शाम कनकधर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाले.

या स्पर्धेत नळदुर्ग, अणदुर, अक्कलकोट, कुमठा, मुरुम,इंडी, भुसनुर,काटगाव व किणी येथील मरगम्मा समाजाच्या क्रिकेट संघांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी भीमा कोळी, सुरेश कोळी, रमेश कोळी, शंकर कोळी, कोंडीराम कोळी, मारुती कोळी, निंगापा कोळी, राजकुमार कोळी, राजु कोळी, आणप्पा कोळी व अर्जुन कोळी यांच्यासह समाजबांधव परीश्रम घेत आहेत.


 
Top