कळंब (प्रतिनिधी)-फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी  जि. प. प्रा. शा. हसेगाव केज या शाळेने दरवर्षीप्रमाणे यशाची परंपरा कायम राखली आहे. 

यावर्षी नवोदय परीक्षेत यश मिळवलेली विद्यार्थिनी कुमारी प्रांजली अशोक तोडकर ही शिष्यवृत्ती धारक झाली आहे. तिला  अमोल बाभळे, राजाभाऊ गुंजाळ, प्रशांत घुटे  समाधान भातलवंडे, विकास खारके, विद्या मनगिरे,कालींदा समुद्रे, लक्ष्मी कोकाटे, प्रतिभा बिडवे व मुख्याध्यापक रामेश्वर जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सरपंच सौ. मनीषा विलास पाटील, उपसरपंच रूपाली प्रदीप खरडकर व सर्व सदस्य, विस्ताराधिकारी सुशील फुलारी, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.


 
Top