धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असुन धाराशिव जिल्हाध्यक्षपदी संताजी चालुक्य यांची निवड करण्यात आली आहे. चालुक्य हे उमरगा येथील असुन भाजपचा या भागातील सर्वसमावेशक चेहरा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे निवड जाहीर केली आहे. चालुक्य यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज उत्सुक होते. त्यांनी तगडी फिल्डिंग लावली होती. मात्र अखेर चालुक्य यांनी बाजी मारली. नितीन काळे हे जिल्हाध्यक्ष होते त्यांच्याकडुन चालुक्य हे सूत्रे स्वीकारतील.

 तसेच भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव नूतन जिल्हाध्यक्षपदी संताजी चालुक्य यांची निवड झाल्याबद्दल शिवाजी चौक येथे फटाके फोडून व पेठे वाटुन आनंद उत्साह साजरा करण्यात आला.इयावेळी व्यंकटराव गुड, अनिल काळे, प्रविण पाठक, लक्ष्मण माने, सतिष देशमुख गुलकंद व्यवहारे, अँड खंडेराव चौरे, ओम नाईकवाडी, डॉ. गोविंद कोकाटे,  विनोद गपाट, वैभव हानचाटे, शेषेराव उबरे, महेंद्र बिदरकर, संदीप इंगळे, अजय यादव आदी उपस्थित होते.

 
Top