नळदुर्ग (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शासन दरबारी प्रयत्न करून नळदुर्ग नगर पालिकेला उपलब्ध करून दिलेल्या 7 कोटी रुपये निधीतील 32 कामांना अखेर सुरुवात झाली आहे. या कामांमुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे.

नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. नळदुर्ग नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शहर विकास कामांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या कांही दिवसांपुर्वी नगरपालिकेने 7 कोटी रुपये खर्चाच्या  कामांचे टेंडर काढले होते. शहरांतील सर्व प्रभागांमध्ये ही विकास कामे होणार आहेत,. यामध्ये सिमेंट रस्ते, गटार बांधकाम, गार्डन तयार करणे, सभागृह यासह विविध कामांचा समावेश आहे. शहरांतील भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे शहरांतील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शहर विकास कामांसाठी मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. सध्या 7 कोटी रुपये खर्चाची विकास कामे सुरू आहेत. इतर आणखी विकास कामे लवकरच सुरू होणार असल्याचेही भाजप पदाधिकारी यांनी म्हटले आहे.

टेंडर प्रक्रिया पुर्ण होऊनही ही कामे सुरू करण्यात आली नव्हती त्यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू होत्या. मात्र आता ही कामे सुरू झाल्याने कामासंदर्भातील चर्चाना आता पुर्ण विराम मिळाला आहे. आता ही सर्व कामे चांगल्या दर्जाचे करून घेण्याची जबाबदारी ही जितकी नगरपालिका प्रशासनाची आहे तितकीच किंव्हा त्याहुन जास्त जबाबदारी ही नागरीकांची आहे.

 
Top