तुळजापर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहराजवळ असणार्या आपसिंगा रोड नगर परिषदेच्या वाढिव हद्दीत सर्वे नंबर 13 येथिल आरक्षित जागेतील विना परवाना, अनाधिकृतपणे माती, मुरूम येथील विटभट्टी करीता आरक्षीत शासकीय जागेतील विना परवाना, माती, मुरूम उचलून वाहतूक करणा-या संबंधितावर कठोर कारवाई यावे अशी मागणी पांढरे यांनी निवेदन देवुन केली आहे.
आपसिंगा गाव रोड परिसरातील अवैध खनिज उत्खनन हा तालुक्यात नव्हे तर जिल्हयात चर्चचा विषय बनला आहे. येथील अवैध उत्खनन प्रकरण हायकोर्टा पर्यत पोहचले आहेत.यामुळे अवैध मुरुम माती उपशा तुन मालामाल झालेला तहसिल कर्मचार्यास आपली जागा खाली करावे लागल्याचे वृत्त आहे हा माणुस गेला तरीही पुन्हा या भागात अवैध उत्खनन चालुच आहे.
तुळजापूर नगर परिषदेच्या वाढिव हद्दी अपसिंगा रोड भागातील सर्वे नंबर 13 येथील आरक्षित जागेतील विना परवाना, अनाधिकृतपणे माती, मुरूम येथिल विटभट्टी करीता ट्रॅक्टर मधुन घेऊन जात आहेत. सदर जागा हि शासकीय आहे. विना परवाना अनाधिकृतपणे माती, मुरूम काढून जागेवर खड्डेच्या खड्डे करत आहेत. तालुक्यात अनाधिकृतपणे माती मुरूम काढून वाहतूक केली जात आहे. तसेच वडगाव काटी, सावरगाव, तामलवाडी, धोञीसह अनेक खडी केंद्र चालक परवानगी पेक्षा अधिक दखड, माती, मुरूमची वाहतूक करून महसुल बुडवत आहे. या मंडळीवर कारवाई होणार का ? कि मागील अनेक वर्षा सारखे पुढे चालुच राहणार असा सवाल होत आहे.