तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील अपसिंगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सोमवार दि. 10 जूलै रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग व शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व शाळा परिसरात शंभर वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला.

 यावेळी विजय क्षीरसागर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा चे महत्व पटवून देताना म्हणाले की, या सुरु झालेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा मुळे गावच विध्यार्थांंचे व भविष्य उज्वल, होणार आहे.तरी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी विजय क्षिरसागर यांनी केले.

यावेळी गावचे सरपंच अजित क्षीरसागर, शालेय समितीचे अध्यक्ष गणेश बामणे, ग्रामपंचायत सदस्य आबा गुरव, अहमद काझी, राहुल गोरे, सुशांत रोकडे, भैय्या रोंगे, मनीषा दीक्षित व नाना कसबे मुख्याध्यापक पाटील, खाजुद्दीन नाईकवाडी इत्यादी ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

 
Top