वाशी (प्रतिनिधी)-तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथील वार्ड क्र. मधील व पाणी पुरवठा करणार्या नळाचे सर्व वाल्व्ह खराब झाले आहेत. तर पाईपलाईन देखील फुटलेली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला असून तो सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी वार्ड क्र 3 मधील ग्रामपंचायत सदस्य व वार्डमधील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे वाशी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथील वार्ड क्र. 3 मधील नागरिकांना पाणी पुरवठा करणार्या नळाचे सर्व वाल्व्ह खराब झाले असून पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थित व सुरळीत होत नाही. याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन वारंवार मागणी केली. मात्र त्यांनी याबाबत कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे या वार्डमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे महिला ग्रामपंचायत सदस्य असलेल्यांचे पती या भागातील नागरिकांना आडवे बोलत आहेत. तलाठी तसेच ग्रामसेवकांना देखील ते दाद देत नाहीत. ते त्यांना याविषयी काहीच बोलू देत नाहीत. त्यामुळे संबधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन नवीन पाईपलाईन बसवून या भागातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावर सुभाष पाटोळे, औदुंबर तावरे, उमेश गाडे, नागनाथ गाडे, धनंजय गाडे, रत्नदीप गाडे, रमेश गाडे, अविनाश गाडे, भारत निरगुडे, मिलींद गाडे, सुशील गाडे, सुरेश गाडे, अशोक कांबळे, महादेव शिंदे, संजय शिंदे, तुकाराम शिंदे, ज्योती यादव, आकांक्षा गाडे, जया गाडे, गोवर्धन गाडे, दीक्षा गाडे, किंचल गाडे व रंजित गाडे आदींच्या सह्या आहेत.