नळदुर्ग (प्रतिनिधी)- नशा मुक्त भारत करण्यासाठी विद्यार्थी यांनी पुढाकार घ्यावा व आपल्या परिसरातील व्यसनी माणसाला नशे पासून मुक्त करण्यासाठी प्रचार प्रसार व प्रबोधन करावे असे आवाहन नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे उस्मानाबाद जिल्हा संघटक मारुती बनसोडे यांनी आवाहन केले आहे.धरित्री विद्यालय अलियाबाद नळदुर्ग येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सुनील पुजारी होते. पुढे बोलताना मारुती बनसोडे म्हणाले की जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वे नुसार 2020 ते 2030 पर्यंत जगातीलसुमारे 100 कोटी लोक तंबाखूच्या रोगामुळे मृत्यु पावतील. त्यात भारतातील 20 ते 30 वयोगटातील 40 टक्के लोक असू शकतील. यासाठी याला प्रतिबंध करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार विविध उपाय योजना करीत आहे. तर नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही संस्था सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने राज्यातील सर्व जिल्ह्यात व्यसन विरोधी प्रचार प्रसार व प्रबोधन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. असे मारुती बनसोडे यांनी सांगितले आहे.
अध्यक्षीय समारोप करताना सुनील पुजारी यांनी नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य करीत आसलेल्या कामात सहयोग देण्याचे जाहीर केले आहे. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक कोकणे यांनी केले व आभार प्रदर्शन सातलगावकर यांनी मानले आहे यावेळी जगताप, चव्हाण, होळे, कारंजा मॅडम व विदयार्थी विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते शेवटी सर्व विद्यार्थ्यांना व्यसन विरोधी माहिती पत्रक वाटप करण्यात आले.
