धाराशिव (प्रतिनिधी)-खरीप पिकात गोगलगाय व पैसा यासह किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत, या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना गुरूवारी (दि.20) निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की,  जिल्ह्यात या वर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. या जेमतेम पावसावरच शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरणी केल्या आहेत. आता या पिकात शंखी गोगलगाय आणि पैसा या कीटकासह कीडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. हे कीटक  सोयाबीनसह अन्य कोवळी पिके खाऊन टाकत आहेत. यामुळे शेतकर्‍यांपुढे मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.  निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके,अमोल मोरे, शिवाहरी भोसले,दादासाहेब मोरे, ज्योतीराम काळे आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top