तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर लातुर महामार्ग रस्त्यावर असणार्‍या काक्रंबा गावालगत पुला जवळ कारचे  टायर फुटल्याने  बँलन्स जावुन गाडी पलटी होवुन भिंतीवर धडकुन झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले  सुदैवाने या गाडीत असणारे चार जण बचावले गेले .हा अपघात शनिवार दि  8 जुलै रोजी सकाळी 7.30 वा सुमारास घडला.

या बाबतीत अधिकमाहीतीअशीकी मुंबईहुन पाटील परिवार कार क्रमांक एमएच 02 एफजे 8398 मधुन लातूरकडे जाताना काक्रंबा गावालगत असणार्‍या धोकादायक पुलाजवळ कारचे टायर फुटल्याने कारचा बँलन्स जावुन कार पलटी होवुन कार भितीला धडकली. 

यात  पवन पाटील व यश सागावे यांना किरकोळ मार लागला. अन्य गाडीतील दोन महिला प्रगती पाटील व भक्ती पाटील यांना साधे खरचटले ही नाही.


 
Top