तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे पेरणी साठी शेतात शेतकर्‍याचे घर गेलेल्या 7 जुलै रोजी सकाळी 11 वा अज्ञात चोरट्यांनी घर फोडुन 1 लाख 85 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 7 जुलै रोजी बालाजी गुंजकर यांचे आई - वडील हे सकाळी 11 वा.सु. घराला कुलूप लावून शेताकडे पेरणी करण्यासाठी गेले होते. आणि फिर्यादी हे उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये होते. साडेतीन वा.सु. फिर्यादीची आई मंदाबाई गुंजकर या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना कोणी तरी घराचे कुलुप तोडून बाजूला फेकलेले दिसले. नंतर मंदाबाई यांनी घरात जाऊन बघितले तेव्हा बेडरूम मधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. अशा प्रकारे घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुपारी एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून घरात घुसून बेडरूम मधील कपाटातील तिजोरीवर डल्ला मारून सोन्याच्या  6 अंगठ्या, सोन्याचे नेकलेस, चांदीचे वाळे, चांदीची चैन, आणि रोख रक्कम 11 हजार रु. असा एकूण जवळपास 1 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.


 
Top