तुळजापूर (प्रतिनिधी)- मंगरूळ येथे गोगलगाय नियंत्रण करणे याविषयी शेतकर्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
गोगलगायचा प्रादुर्भाव दिसून आल्यास सर्व गोगलगाय हाताने गोळा करून मिठाच्या पाण्यामध्ये टाकाव्यात. तसेच बांधाच्या कडेने चुन्याची फक्की टाकून घ्यावी. तसेच बांधाच्या कडेने गुळाच्या पाण्यामध्ये गोणपाट भिजवून दहा ते पंधरा ठिकाणी रात्री अंथरणे व सूर्योदयापूर्वी त्या गोणपटावर जमा झालेल्या गोगलगायी साबणाच्या पाण्यामध्ये नष्ट करणे. गोगलगायचे अंडी नष्ट करण्यासाठी पिकांमध्ये कोळपणी करून घेण्याचे प्रात्यक्षिक शाम कमलाकर साठे यांच्या शेतात करून दाखवण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, मंडल कृषी अधिकारी अनिल जगदाळे, कृषी सहायक नवनाथ आलमले, अनिल पवार, ग्रामसेवक लक्ष्मण सुरवसे, तलाठी डावारे, सरपंच सौ विजयालक्ष्मी डोंगरे, उपसरपंच गिरीश डोंगरे, जि. प. माजी सभापती मुकुंद डोंगरे तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
