तुळजापूर (प्रतिनिधी)- पावसाळ्याच्या व इतर महत्वाची बाबीच्या अनुषंगाने शहरातील सर्व नागरिकांनी व भाविकांनी घरामध्ये तसेच घराबाहेर खालील प्रमाणे योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन नगर परिषद प्रशासन तथा उपविभागीय अधिकारी योगेश खैरमाटे व प्रभारी मुख्याधिकारी लक्षमण कुंभार यांनी केले आहे. 

पावसाळ्यात दिवसां विजेच्या खांब आणि वीज तारांच्या जवळ तसेच डीपी जवळ जाऊ नये विज दुर्घटने होवु नये यासाठी योग्य ती काळजी घ्या. आपल्या घर व शहर परिसरात स्वछता राखा आपली वाहने  वाहनतळात उभे करा,  रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी वाहने पार्किंग करून येणार्‍या

भाविकांना गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घ्या. नगर परिषदेच्या हद्दीमध्ये पर्यावरणास हानिकारक असणार्‍या प्लास्टिक कॅरीबॅग व तत्सम वापरण्यावर बंदी घालण्यात आली असुन प्लास्टिक पिशव्या ऐवजी पर्यावरण पूरक व विघटनशील अशा कागदी व कापडी पिशव्या बांबूची छोटी टोपली इत्यादी चा वापर करा. 

प्लास्टिक पिशवी हाताळणे अथवा साठवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नागरिक घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2000 नुसार गुन्हा नोंद करण्यात येईल याची नोंद घ्या मा. जिल्हाधिकारी यांनी  22 मे 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार नागरी क्षेत्रात बॅनर/पोस्टर/होर्डिंग इत्यादीसाठी ्नयुआर कोड बंधनकारक केले आहेत. ज्यांना अशाप्रकारे बॅनर पोस्टर होल्डिंग लावायचे असतील त्यांनी नगर परिषदचा कर भरूनच ्नयुआर कोड सह न.प.निर्धारित केलेल्या जागेवर लावावी. या सुचनांचे पालन करुन नगरपरिषद ला सहकार्य करण्याचे आवाहन  योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद तुळजापूर, लक्ष्मण कुंभार मुख्याधिकारी

नगरपरिषद तुळजापूर यांनी केले आहे.

 
Top