धाराशिव (प्रतिनिधी)-शासकीय वैद्यकीय महाविंद्यालयाच्या रूग्णालयास शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी अचानक शुक्रवारी दुपारी भेट देवून पाहणी केली. या पाहणी मध्ये अनेक रूग्णांनी औषधे मिळत नसल्याची तक्रारी केल्या. सदर तक्रारीची दखल घेवून आ. पाटील यांनी उपस्थित अधिकारी व डॉ्नटरांकडून अधिक माहिती घेतली. या संदर्भात आपण वैद्यकीय आरोग्य सचिव यांची भेट घेवून कारभार सुधारण्याची मागणी करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना साांगितले.

जिल्हा रूग्णालयाचे हस्तातंर जून 2022 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. त्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण करण्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आमदार कैलास पाटील यांनी घेत एकेका विभागामध्ये जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. पहिल्यांदा औषध वाटप काऊंटरकडे च्नकर मारली. तिथे पित्त, ताप, सर्दी, खोकला या किरकोळ आजारावरील औषधासाठी तुटवडा दिसला. अशा औषधासाठी नागरिकांना खाजगी दुकानाकडे जाण्यास सांगण्यात येत होते. तर सिटीस्कॅन मशीन, अस्थिरोग ऑपरेशन थिएटर, ब्लड सेप्रेशन मशीन बंद अवस्थेत होती.

8 कोटी रूपये उपलब्ध करू दिले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा नियोजन समितीने 8 कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी 3 कोटी औषधांसाठी, 3 कोटी यंत्र सामुग्रीसाठी, 2 कोटी बांधकाम व दुरूस्तीसाठी या प्रमाणे पैसे उपलब्ध करू दिले असून, सिटीस्कॅन मशीन, ऑपरेशन थिएटर, र्नत सेप्रेशन मशीन बंद आहे. त्याचप्रमाणे पुरेशा औषध साठाही नाही. महाविकास आघाडीच्या काळात शासकीय वैंद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यामुळे ते उत्तमपणे चालावे त्याला जोडलेले शासकीय रूग्णालयपण चांगल्या प्रकारे रूग्णसेवा द्यावी यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न चालू असून, आपण लवकरच वैद्यकीय आरोग्य सचिव यांची भेट घेणार असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी पु. वि. लोकराज्यशी बोलताना सांगितले.


 
Top