धाराशिव (प्रतिनिधी)-श्रध्दा शरद पवारांवरच मात्र, साथ उपमुख्यमंत्री अजित पवारांची असे सुत्र व्य्नत करत अजितदादा गटाच्या बैठकीत नेते व कार्यकर्त्यांनी पक्षवाढीचा निर्धार केला. भाजपसोबत केवळ विकासाकरिता गेल्याचे सांगत हिंदूत्वाचा स्विकार करणार नसल्याबाबतही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीत एका आमदारासह प्रदेश व जिल्हास्तवर काम करणार्या नेत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. विशेष म्हणजे बैठकीतील बॅनरवरही शरद पवार यांचे छायाचित्र लावण्यात आले होते.
काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीच्या एका गटाने बैठक घेवून शरद पवार यांनाच साथ देण्याचा निर्धार व्य्नत केला होता. यावेळी पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दि. 14 जुलै रोजी घेतलेल्या दुसर्या बैठकीचे चित्र कसे असणार याबाबत उत्सुकता होती. प्रदेश सचिव सुरेश पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीसह नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची चांगली उपस्थिती होती. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी अगोदरच जोरदार भाषण करून बैठकीत जीव ओतला. त्यांनीच सुरूवातीला शरद पवार आमचे दैवत असल्याचा सुर आवळत जिल्ह्याचे जावई असलेल्या अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. यानंतर प्रदेश सचिव पाटील, बिराजदार, जिल्हा परिषदेतील पक्षाचे माजी गटनेते महेंद्र धुरगुडे यांनीही अशीच भूमिका मांडली. यावेळी प्रत्येकजण आपली धर्मनिरपेक्ष भूमिका सोडणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सांगितले असल्याचे सांगत भाजपच्या कोणत्याही तत्वाचा स्विकार करणार नसल्याचे सांगत हिंदूत्वाशी काहीही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट केले. काही व्नत्यांनी तर भाजपवर मनुवादाचा श्निका मारत आपला गट तसे करणार नसल्याचेही स्पष्ट केले.