तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत असणार्‍या सिंदफळ हद्दीतील श्री. मुदगुलेश्वर शंभु महादेव मंदिरास जाणार्‍या दीड किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. अधिक श्रावण मास पार्श्वभूमीवर दोन महिने श्रीमुदगुलेश्वर शंभुमहादेव दर्शनार्थ भाविक मोठ्या संखेने जात असल्याने सदरील रस्ता त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी शंभुमहादेव भक्तांमधुन केली जात आहे. 

तुळजापूर-बार्शी रस्त्यावर श्री. मुदगुलेश्वर शंभु महादेव घनदाट वर्द वनराईत मंदिर आहे. अधिक श्रावण मासात येथे दर्शनार्थ मोठ्या संख्येने पहाटे पासुन राञीपर्यर्त गर्दी करतात.

बार्शी रोड कमानपासुन ते श्री. मुदगुलेश्वर शंभुमहादेव मंदिरापर्यत दीड किलोमीटर  शंभुमहादेव भक्त पायी चालत जातात.  सदरील रस्ता काही वर्षापुर्वी बनवला  असल्याचे  समजते. सध्या या रस्त्यावर असणारे डांबर जावुन खडी राहिली आहे. खड्डे ही आहेत. पावसाळ्यात काही ठिकाणी चिखलातुन जावे लागत आहे. रस्ताची  दुरावस्था झाली असल्याने शंभुमहादेव भक्तांचा सोयीसाठी हा रस्ता त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.


 
Top