उमरगा (प्रतिनिधी)-वडील थकले म्हणून त्यांना घराबाहेर काढण्याची आमची संस्कृती नाही. अफजलखानाच्या लाखोंच्या फौजेला शिवरायांच्या मुठभर मावळ्यांनी धूळ चारली होती. मोदी शहांच्या विरोधात, महाराष्ट्राची अस्मिता विकायला निघालेल्या फडणवीस यांच्या विरोधात आपण ठामपणे उभे रहावे. कितीही फोडाफोडी करु शकता पण राज्यातील माणसांची अस्मिता विकत घेऊ शकत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहण्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पाठीशी असलेल्या उमरगा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बुधवारी (दि.12) उमरगा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, उमरगा बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र तळभोगे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष प्रताप तपसाळे, कुमार थिटे, रेणके, धिरज बेळंबकर, शंतनू सगर, जगदीश सुरवसे, दिपक हिप्परगे, भैय्या शेख, महिला तालुकाध्यक्षा जया माशाळ, शहरप्रमुख राजश्री सुरवसे, सावळसुरचे सरपंच संगीता पवार, संगीता गोगावे, अनिल व्हंताळकर आदी उपस्थित होते. 

या बैठकीत शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार करुन शपथपत्र देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जगदीश सुरवसे यांनी केले.


 
Top