तेर (प्रतिनिधी)-बायफ संस्था व टिसीआय मार्फत महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबादी जातीवंत शेळी वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहे यामध्ये टिसीआय यांनी भारतातील चार राज्यातील काही जिल्हयामध्ये या प्रकल्पाची सुरूवात केली आहे. व महाराष्ट्रमध्ये धाराशिव जिल्हयाची निवड झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने जातीवंत उस्मानाबादी शेळयाची जात नामशेष होत चालली आहे, ही टिकवण्यासाठी बायफ संस्थेकडून वेगवेगळया प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. 

यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तेर, ढोकी, वाखरवाडी, ढोराळा या गावाची निवड केली आहे. यामध्ये शेळी पालकांचा सर्वे करून ज्या शेळी पालकाची निवड झाली आहे. त्यांना दोन गटामध्ये विभागून प्रकल्पाबद्दल विस्तार कार्यक्रम घेवून त्यांच्या सर्व शेळयाना टॅग मारणे, जंतनाशण औषध पाजणे, सर्व प्रकारचे लसीकरण करणे, बेरड बोकडाचे खच्चीकरण करणे, माजावर येणार्‍या शेळ्याना कळपातूण वेगळे करून उंच्च प्रतीच्या उस्मानाबादी बोकडाचे सिमेन वापरून तयार केलेल्या सिमेनने त्या शेळीला कृत्रिम रेतन करणे, व जातीवंत उस्मानाबादी शेळी तयार करणे, यामध्ये जन्माला आलेल्या पिल्याचे वजन घेणे, विस्तार कार्यक्रम घेणे, आशा विविध योजना शेळीपालकांच्या घरी जावून दिल्या जाणार आहेत. शेळी पालकांना चांगले दिवस येण्यासाठी बायफ संस्था प्रयत्न करत आहे. या प्रकल्पामध्ये ज्या शेळी पालकांची निवड झाली आहे अशाच शेळी पालकांना यांचा लाभ मिळणार आहे. हा प्रकल्प  डॉ. एकशिंगे संतोष (राज्य प्रकल्प अधिकारी बायफ) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यासाठी पशू वैद्यकीय अधिकारी तसेच डॉ. आतूल मुळे, प्रकल्प समन्वयक बायफ बिआयएसएलडी  धाराशिव, किसन शिंदे कृत्रिम रेतन केंद्र प्रमुख बायफ, सौरंभ जाधव, वैभव चव्हाण हे काम करत आहेत.


 
Top