धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शाहुस्मृती सांजानाका येथे कलाविष्कार अकादमी द्वारा मेलडी स्टार्सच्यावतीने गायक मुकेश यांच्या जयंती निमित्त गायनातून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मेलडी स्टारचे मुख्यप्रवर्तक युवराज नळे, समन्वयक रवींद्र कुलकर्णी, मुकुंद पाटील, शरद वडगावकर, अरविंद पाटील, राजाभाऊ कारंडे, तौफीक शेख, उमाकांत कुलकर्णी, श्रेया गायकवाड उपस्थित यांनी गायन केले.
