तुळजापूर (प्रतिनिधी)-टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व सामाजिक वनीकरण विभाग, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मियावॉकी घनवनामध्ये 25 प्रजातीच्या 13 हजार 200 वृक्षांचे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.   

या  वृक्षारोपण कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल,  कुलकर्णी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे उप संचालक प्रो. रमेश जारे, विभागीय वनाधिकारी, आर आर चोबे,आरएफओ पंचरंडे, टाटाचे गणेश चादरे, डॉ. संपत काळे, डॉ. श्रीधर सामंत, राम राठोड, आनंद भालेराव, शंकर ठाकरे, आरओ शहाजी देशमुख, ऋषभ चौधरी, कोहिजनचे डॉ. दयानंद वाघमारे, टाटाचे विद्यार्थी, कर्मचारी सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मियावॉकी मध्ये फळांची, फुलांची, वनौषधी व दुर्मिळ अशा देशी प्रजातीच्या 13 हजार 200 वृक्षांची लागवड म्हणजे मानवाबरोबरच निसर्गातील पशुपक्षी, वन्यप्राणी व जीवजंतू यांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बरोबरच सर्वच घटक या वनामध्ये असल्यामुळे हे घनवन सर्वांसाठी जीवनदायिनी असल्याचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.  

या प्रसंगी प्रो. रमेश जारे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रामुख्याने पर्यावरण संवर्धन या विषयाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाले आहे. टिस हे पहिले विद्यापीठ आहे. ज्यांनी सर्वात प्रथम मियावॉकी घनवनाची उभारणी केली आहे. या प्रसंगी शहाजी देशमुख, गणेश चादरे, संपत काळे यांनीही मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी ग्रीन यात्री संस्था मुंबईचे मियावॉकी तज्ञ ऋषभ चौधरी यांनी ही वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले. या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम राठोड यांनी पर्यावरण विषयक घोषणा देवून विद्यार्थ्यामध्ये नव चेतना निर्माण केली.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाटाचे गणेश चादरे, आनंद भालेराव, शंकर ठाकरे, सर्व विद्यार्थी सामाजिक वनीकरण विभागाचे शहाजी देशमुख व त्यांच्या सर्वच कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.


 
Top