मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई

उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 23 जुलै रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 206 कारवाया करुन 1,49,600 छतडजोड शुल्क वसुल केले आहे.


रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणार्‍यावर गुन्हा नोंद

परंडा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)सुलेमान अल्लाबक्ष पठाण, वय 26 वर्षे, रा. अरणगाव, ता. परंडा  जि. उस्मानाबाद यांनी दि.23.07.2023 रोजी 18.05 वा.सु. राफीया स्टील न्ड हार्डवेअर फॅब्रीकेशन परंडा येथे आपल्या ताब्यातील पिकअप क्र एमएच 45 टी 2172 हा तर आरोपी नामे 2) महादेव विठ्ठल सुर्यवंशी  वय 37 वर्षे, रा. डोंजा, ता. परंडा जि. उस्मानाबाद  यांनी याच दिवशी 18.30 वा. सु. देवकर हॉटेल समोर परंडा करमाळा रोड येथे आपल्या ताब्यातील छोटा हत्ती क्र एमएच 45 एजे 2780 हा रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.द.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो. ठाणे येथे  स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) सुरज राजेंद्र गरड, वय 29 वर्षे, रा. पिनाणी वडगाव, ता. कळंब  जि. उस्मानाबाद यांनी दि.23.07.2023 रोजी 13.30 वा. सु. ढोकी पेट्रोलपंप चौक  येथे आपल्या ताब्यातील पिकअप क्र एमएच 25 एजे 5306 हा रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.द.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द ढोकी पो. ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.


निष्काळजीपने वाहने चालवणार्‍यावर गुन्हे नोंद

ढोकी पोलीस ठाणे : अरोपी नामे- 1) तुषार बळीराम आदमाने, वय 26 रा.बोरगाव काळे, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.23.07.2023 रोजी 14.00 वा. सु. ढोकी पेट्रोलपंप चौक येथे आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एम.एच. 24 एक्स 7620 ही ढोकी पेट्रोलपंप चौक येथे रोडवर भरधाव वेगात निष्काळजीपने चालवत असताना ढोकी पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्ती विरुध्द भा.दं.वि.सं. कलम- 279 अन्वये ढोकी  पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


   मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामेरमजान रजाक शेख, रा. हमीदनगर, उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे दि.23.07.2023 रोजी 18.45 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही बसस्थानक समोर उमरगा येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात

भुम पोलीस ठाणे : भुम पो.ठा. चे पथक दि. 23.07.2023 रोजी 02.15 वा.सु. भुम शहरात रात्रगस्तीस असताना दरम्यान शहरातील बसस्थानक भुम चे मागील अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- नामदेव राजाराम काळे, वय 28 रा. सितारामगडा जवळ बोरखेडा रस्ता खर्डा, ता. जामखेड असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणार्‍यावर गुन्हा दाखल

वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे- जावेद आयुब कुरेशी, रा वाशी, ता. वाशीजि. उस्मानाबाद अन्य 2  यांनी   दि.23.07.2023 रोजी पुर्वी जावेद आयुब कुरेशी चे राहते घराचे पाठीमागे जनवारांचे कत्तली करुन त्यंची पिकअप वाहन क्र एमएच 48 ए जी 7461 मधून वाहतुक करताना वाशी पो ठाणे च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5(क), 9(अ), 11 अन्वये  वाशी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


मारहान

परंडा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) संदीप भास्कर पाटील, 2) बाळासाहेब भास्कर पाटील, 3) किशोर भास्कर पाटील, 4) भास्कर रंगनाथ पाटील, 5) हनुमंत श्रीधर पाटील, 6) धनाजी रावसाहेब पाटील, 7) राहुल रावसाहेब पाटील, 8) शैला संदीप पाटील, 9) पुजा किशोर पाटील, 10) मोनिका बाळासाहेब पाटील सर्व रा.मॉला वस्ती, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी शेतीच्या वादाचे कारणावरून दि.23.07.2023 रोजी 09.30 वा. सु. लोणी शिवार शेत गट नं 487 मध्ये फिर्यादी नामे- शांतीसागर शंकर घुबडे वय 24, रा. मावला वस्ती, लोणी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांचे वडीलंना  शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी काठीने, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शांतीसागर घुबडे यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324,323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) शंकर निवृत्ती घुबडे, 2) शांतीसागर शंकर घुबडे, 3) भास्कर शेकर घुबडे, 4) सत्यवान महादेव घुबडे, 5) सिध्देश्वर महादेव घबडे, 6) कल्याण बबन फरताडे, 7) महादेव तुळशिराम घुबडे 8) विद्या शंकर घुबडे, 9) पारु(उषाबाई) महादेव घुबडे रा.जवळे दु, मावला वस्ती लोणी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी रस्त्याने वस्तीकडे जाण्याचे कारणावरून दि.23.07.2023 रोजी 10.00 वा. सु. मावला वस्ती लोणी येथे फिर्यादी नामे- किशोर भास्कर पाटील वय 34, रा. मावला वस्ती लोणी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांना शांतीसागर  घुबडे यांनी शिवीगाळ करुन लोखंडी गजाने, कुह्राडीचे दांड्याने पाटीवर मारहाण केली. किशोर यांचे भाउ संदीप पाटील, बाळासाहेब पाटील व वडील भास्कर पाटील हे त्यांचे बचावास आले असता त्यासही वरील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या किशोर पाटील यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) जगदिश भास्कर देवकर, रा. दाउतपूर,2) तानाजी अमृत देवकर रा. कारला ता. तुळजापूर,3) भागुबाई दगडू देवकर, 4) सुसाबाई भास्कर देवकर, 5) भास्कर देविदास देवकर, 6)  दगडू देविदास देवकर रा. दाउतपूर जि. उस्मानाबाद अन्य 3 यांनी रस्त्याने जाण्याचे कारणावरून दि.20.07.2023 रोजी 17.00 वा. सु. दाउतपूर शिवारातील शेतात फिर्यादी नामे- स्वाती राजेंद्र पांढरे वय 35, रा. दाउतपूर ता. जि. उस्मानाबाद यांची चुलत सासु छाया यांना जगदिश देवकर यांनी शिवीगाळ लोखंडी कुदळीचा दांड्याने मारहाण करत असताना स्वाती पांढरे त्यांचे बचावास आले असता त्यासही तानाजी देवकर यांनी लोखंडी कुदळ मारुन जखमी केले. भागुबाई देवकर, सुसाबाई देवकर, दगडु देवकर यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या स्वाती पांढरे यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) राजेंद्र मच्छिंद्र मगर, 2) जालींदर हरी मगर, 3) नितीन राजेंद्र मगर, 4) दर्शन संतोष कांबळे, 5) राहुल भांडवले 6) शुभम डांगे सर्व रा. उस्मानाबाद यांनी आर्थिक व्यवाहारचे कारणावरुन दि.22.07.2023 रोजी 21.00 वा. सु. साठे चौक उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे-विशाल बाबु लोंढे, वय 26 वर्षे, साठेनगर उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद यांना राजेंद्र मगर यांनी शिवीगाळ करुन आरोपी नामे जालींदर मगर, नितीन मगर, दर्शन कांबळे यांनी दगडाने पायावर पाठीवर मारुन जखमी केले. राजेंद्र मगर यांनी लोखंडी सळईने मारहान केली. राहुल भांडवले व शुभम डांगे यांनी विशाल लोंढे यांना तु आम्हास भांडणात दगड का मारले म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विशाल लोंढे यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 294, 341,  323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) दादाराव गजेंद्र मुंडफणे, रा. ढेकरी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी शेतीच्या वादाचे कारणावरुन दि.23.07.2023 रोजी 19.30 वा. सु. शेत गट नं 513 मध्ये ढेकरी येथे फिर्यादी नामे- सुधाकर गजेंद्र मुंडफणे, वय 52 वर्षे, रा. ढेकरी, ता तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना दादाराव मुंडफणे यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने छातीवर मारुन जखमी केले. फिर्यादीचा मुलगा समर्थ यास पाटीवर मारुन जखमी केले. फिर्यादीच्या पत्नीस धक्काबुक्की केली.  तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुधाकर मुंडफणे यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मालमत्तेविरुध्द गुन्हे

वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- बाळू बाबासाहेब गंगावणे, वय 35 वर्षे, रा. लोणवळ, ता. वडवणी जि. बीड यांची अंदाजे 30,000 छ किंमतीची होंडा पॅशन मोटरसायकल क्र एमएच 11 बी एक्स 2261 ही दि.21.07.2023 रोजी 22.30 ते दि 22.07.2023 रोजी 03.30 वा. सु. हॉटेल उमंग चे शेजारील झोपडपट्टी वाशी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाळू गंगावणे यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top