धाराशिव (प्रतिनिधी)-अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो असे मत शिवसेना (ठाकरे) गटाचे खा. संजय राऊत यांनी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यातील नवनियु्नत सहसंपर्कप्रमुख म्हणून माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची नियु्नतीच नियु्नती झाली आहे. या नंतर त्यांनी मंगळवार दि. 11 जुलै रोजी खासदार संजय राऊत, शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांची शिवसेना भवन मुंबई येथे भेट घेतली. 


यावेळी खासदार संजय राऊत यांनी आपणास अमुल्य असे मार्गदर्शन केल्याचेही राजेनिंबाळकर यांनी सांगितले. ही माझ्यासाठी कायमच वैचारिक पर्वणी ठरली आहे. तर नेरूरकर यांनी कठीण काळामध्ये आव्हानात्मक पदे संभाळणे कठीण असते. त्यामुळे आपण योग्य हे पद संभाळचाल अशा शुभेच्छा दिल्या. मकरंद राजेनिंबाळकर यांनी सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी अंत्यत निष्ठेने पार पाडीन. आणि संघटनेसाठी रात्रीचा दिवस करून अथक परिश्रम करेन असे सांगितले. या बैठकीत जिल्ह्यातील राजकारणावरही चर्चा करण्यात आली. 


 
Top