धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील कलाविष्कार अकादमी च्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त घेण्यात येणार्या भजन स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाल्या. समता नगर येथील श्री दत्त मंदीरात भजन स्पर्धेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली . प्रास्ताविकातून कलाविष्कार अकादमी चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे यांनी अकादमीचा आशय विषद करून भजनी मंडळांना सामूहिक सादरीकरणासाठी संधी प्राप्त व्हावी म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातील असे सांगितले. त्यानंतर शहर तसेच शहराबाहेरील एकूण भजनी मंडळांनी अभंग गौळणीचे बहारदार सादरीकरण करून सर्वांना भक्तिरसात चिंब करून टाकले.
भजन स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी संगीत क्षेत्रातील नामवंत तज्ञ दीपक लिंगे, आनंद समुद्रे, व राजेंद्र अत्रे हे परिक्षक म्हणून उपस्थित होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक- लक्ष्मीनारायण भजनी मंडळ, सहयोगी कॉलनी सांजा रोड द्वितीय- श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ गणेश नगर धाराशिव, आणि तृतीय क्रमांक - संत जनाबाई भजनी मंडळ शांती निकेतन कॉलनी या भजनी मंडळांचा आला. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमा सुधीर पाटील, कलाविष्कार अकादमी अध्यक्ष युवराज नळे, परिक्षक - पं. दिपक लिंगे , कवी राजेंद्र अत्रे, आनंद समुद्रे, नंदिनी बागल, शर्मिष्ठा डांगे, वर्षा नळे, ड कल्पना निपाणीकर, मनिषा केंद्रे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, अंभगवाणी पुस्तक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. भजन स्पर्धा यशस्वीतेसाठी कलाविष्कार अकादमीचे सचिव शेषनाथ वाघ, सदस्य रवींद्र शिंदे , सुर्यकांत कारंडे, तौफीक शेख , विजय यादव, अतुल कुलकर्णी , प्रसाद वैकुंठे यांनी परिश्रम घेतले तर सुजीत सांळुके व श्री दत्त मंदीर यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन कलाविष्कार अकादमीच्या सदस्या सौ.अस्मिता शिंदे यांनी केले तर कोषाध्यक्ष शरद वडगावकर यांनी आभार मानले.