तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील जवाहार नवोदय विधालयाचा उदय वाघमारे यांच्या वाहतुकिचे अविष्कार मा़ॅडेलची नॅशनल साठी निवड करण्यात झाली. नवोदय विद्यालय समिती, पुणे यांच्या द्वारा 7 व  8 जुलै 2023 रोजी चंद्रपूर येथे संकुल स्तरावरती विज्ञान मॉडेलचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये 18 विद्यालयाचा समावेश होता. त्यातून उदय वाघमारे यांच्या मॉडेलची निवड विभागीय स्तरासाठी झाली होती. विभागीय स्तरावरून आभासी मुलाखतीद्वारे उत्तर प्रदेश मधील लखनऊ तेथे होणार्‍या नॅशनलसाठी वाघामारे यांच्या मॉडेलची निवड झाली.

हे मॉडेल तयार करण्यासाठी सचिन खोब्रागडे, विलास राऊत, अमित दुर्वे, इदू हुडा, यश पाटील, एस. आर गजम यांनी मार्गदर्शन केले. या निवडीबद्दल विद्यालयाचे चेअरमन व धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, विद्यालयाचे प्राचार्य  गंगाराम सिंह यांनी अभिनंदन व सत्कार करून पुढील नॅशनलसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी जाधव यांनी केले.


 
Top