परंडा (प्रतिनिधी) - शहरातील राज कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी नवोदय प्रवेश परिक्षेत श्रेणिक सिताराम पौळ याची निवड झाल्याबद्दल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या हस्ते विश्वसिध्दी कॉम्प्लेक्स येथे  सत्कार करण्यात आला.

सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर प्रवेश परिक्षेत श्रेणिक सिताराम पौळ यांची निवड झाली आहे. इयत्ता पहिली पासून पौळ हा विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होत होता. राज कोचिंग क्लासेसचे संचालक सुजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासात योग्य सातत्य व नियोजन करून जवाहर नवोदय परिक्षेत यश संपादन केले.या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी मनोज पाटील, मार्गदर्शक सुजित देशमुख, सिताराम पौळ ,दादा डाके आदींची उपस्थिती होती.या विद्यार्थ्यांला सुजित देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.जवाहर नवोदय परिक्षेत निवड झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top