धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय येथे सोमवारी (दि.10) सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

सदरील बैठकीसाठी जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष तसेच प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शरदचंद्र पवार यांच्यावर व राष्ट्रवादी प्रेमी यांनी बैठकीस वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले आहे.

 
Top