तुळजापूर (प्रतिनिधी)- वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धमिर्यांचीही धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ’द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची 3,500 कोटी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली 3500 कोटींची भूमी ’लॅण्ड जिहाद’ द्वारे हडपणारा ’वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी हिंदु
जनजागृती समितीचे विक्रम घोडके यांनी श्री तुळजाभवानी मंदिरासमोर झालेल्या ’हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात केली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे अमित कदम, जनहित संघटनेचे अजय साळुंके, प्रशांत कदम (सोंजी), भाजपचे सुहास साळुंके, सावरकर विचार मंचचे बाळासाहेब शामराज, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे सर्वोत्तम जेवळीकर यांनी आंदोलनाचे सूत्रसंचालन केले. आंदोलनाला मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.