धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या तीन वर्षापासून धाराशिव व बीड जिल्ह्यातील कंत्राटदाराचे सव्वाशे कोटी रूपये सरकारकडे अडकले असून, हे बील लवकर मिळावे म्हणून 17, 18, 19 असे तीन दिवस अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल अशी माहिती कंत्राटदार संघटनेचे सज्जन साळुंके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना सज्जन साळुंके यांनी ज्या प्रमाणे जिल्हा परिषद कामाच्या निधीची तरतूद करून काम काढते त्या प्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभागानेही पैसाचे नियोजन करून या पुढे कामे काढावित. आगामी अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न लोकप्रतिनिधी उपस्थित करतील अशी अपेक्षाही व्य्नत केली.

मागील दोन वर्षापासून बीले थकीत असल्याने ठेकेदारांचा व कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तीन दिवसांमध्ये थकीत बिलाबाबत सकारात्मक प्रतिसाद नाही मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करून येणार्‍या काळात कुठलेही शासकीय कामाचे टेंडर न भरण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी मोर्चात अजमेरा, सुनिल जाधव, कैलास घोडके यांच्यासह इतर शासकीय ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top