तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हाध्यक्षपदी तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील महेंद्र भानुदासराव धुरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हाअध्यक्ष पदी महेंद्र भानुदासराव धुरगुडे यांना नियुक्ती पञ प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, उपमुखमंञी अजित पवार यांच्या हस्ते व आ. विक्रम काळे, सुरेश बिराजदार यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
नवनिवार्चीत जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे तुळजापूर तालुक्यातुन विविध जिल्हा परिषद मतदार संघातुन निवडणुक लढविली असुन ते विजयी झाले आहेत. त्यांनी मागील विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटाचा पहिला जिल्हाध्यक्ष पदाचा मान महेंद्र धुरगुडे यांना मिळाला असुन त्यांच्या निवडीचे तालुक्यात फटाके फोडुन हळद कुंकुवाची उधळण करुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकत्यांनी स्वागत केले.
