धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील सर्व शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे केलेली आहेत. मात्र त्यांची देयके अद्यापपर्यंत दिलेली नाहीत. ती बिले तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव कंत्राटदार संघटनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले असून तिसर्या दिवशी दि. 19 जुलै रोजी जागरण गोंधळ घातला. तर विविध मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना दिले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, उपाध्यक्ष डी.जे. शिंदे, सचिव के.डी. घोडके, कोषाध्यक्ष ए.जी. गरड, सुभाष देशमुख, शिवेंद्र कंट्रक्शन धाराशिव, सखाराम डोके - पाटील, धैर्यशील पाटील, संदीप ठोंबरे, विशाल रघोजी, झेड. ओ. मनियार, एस. व्ही. भोईटे अँड कंपनी, मे सिद्धेश्वर कंट्रक्शन कंपनी, अमोल गरड, वैभव गपाट, आर. एम. कदम, सुनील मुंडे, गुलचंद व्यवहारे, केदारनाथ इंगळे, राबत सय्यद, रमीज तांबोळी, सुनील चव्हाण, किरण वाघमारे, विकास मोळवणे, संजय जेवळीकर, आर.जी. सोपान, प्रभू काळे, एस.बी. वाघे, अजय भोसले, अक्षय माने आदींसह सर्व ठेकेदार या जागरण गोंधळ आंदोलनात सहभागी झाले होते.
.................................................
तर काम बंद आंदोलन करणार
शासनाने आमची थकित बिले देऊन टाकावीत. शासनाला सद्बुद्धी यावी व जागृत व्हावे यासाठी हे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तर शासनाने अतिशय तुटपुंजा निधी उपलब्ध करून दिला असून त्या निधीमध्ये बँक, फायनान्स व मजुरांना देण्यासाठी अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा.् जर येत्या 15 दिवसांत निधी उपलब्धत करुन न दिल्यास कामांची निविदा व काम बंद करण्यात येणार असल्याचा इशारा सज्जनराव साळुंके यांनी दिली.
...........................................
ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ
2014 पासून केलेल्या कामांची बिले अद्यापपर्यंत दिलेली नाहीत. तर 5 ते 10 टक्के रक्कम देऊन बोळवण करण्यात येत असल्यामुळे कामगार व बँक यांचे पेंमेंट देखील पुर्णपणे देता येत नाही. मागे कर्नाटक सरकारने असेच धोरण अवलंबिले होते. त्यामुळे कर्जबाजारी होऊन एका ठेकेदाराने आत्महत्या केली. त्यामुळे शासनाने आमची सर्व थकीत बिले काढावीत. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुत्तेदार संघटनेचे रामराजे पाटील यांनी दिला आहे.
