धाराशिव (प्रतिनिधी)-समता-स्वराज आयोजित इन्वेस्ट् इन यूथ या कार्यक्रमांतर्गत  अभियांत्रिकी महाविद्यालयात हॅक्याथॉनचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. 

सलग तीन राउंड पर्यंत चालणार्‍या या हॅक्याथॉनमध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेले पोटेन्शिअल शोधून विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या प्रोजेक्टवर काम करून नवनवीन प्रयोगांद्वारे येणारे आवाहन स्विकारून नवनिर्मिती केली जाते. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील व तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहमती दर्शवली आहे. आणि त्याचबरोबर धाराशिव, औरंगाबाद, पुणे या ठिकाणचा कंपन्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडून समाज उपयोगी प्रोजेक्ट होण्यासाठी सातत्याने मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. 

यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने , इन्वेस्ट इन युथचे आयोजक समता स्वराजचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत खुणे, उपाध्यक्ष संघर्षदीप वाघमारे ,इव्हेंट हेड सुमितकुमार चंदनशिवे, डी आय टी लॅब चे सर्वेसर्वा उमेश दुधभाते, आणि चे पदाधिकारी राजेश शेवाळे, संतोष राजपूत तसेच मॅनेजमेंट टीम मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी अनुष्का मसलेकर, ऋतुजा घोडके, तेजस खराटे ,साईराज माने, महेश राठोड, अभिजीत गवळी, सिद्धांत राऊत, सुमित ठानांबिर, तेजस पेठे , प्रवर्तन जगताप, ऋतुपर्ण शिंदे व सूत्रसंचालनासाठी श्रेयस सूर्यवंशी होते. 

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने म्हणाले की, हॅकॅथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेले पोटेन्शिअल समोर येऊन विद्यार्थी नवनवीन तंत्रज्ञानामध्ये अद्ययावत होऊन यश नक्की मिळवतील. 

यावेळी उमेश दुधभाते, अभिजीत खुणे,  राजेश शेवाळे, सुमितकुमार चंदनशिवे  यांनी विंद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी हॅकॅथॉन समन्वयक प्रा. डी एच निंबाळकर, प्रा. दर्शन ठाकूर आणि प्रा. सुनिता गुंजाळ-कवडे

यांनी महत्वाची भूमिका बजावली. 

 
Top