तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील महिला शेतकर्‍याची रोजगार हमी योजनेतुन घेतलेली विहिर काम पूर्ण होवुन ही त्याच्या मस्टरचे बिले काढले जात नसल्याने शेतकरी अर्थिक दृष्ट्या त्रस्त झाला असून तरी विहिरीचे बिल तात्काळ देण्याची व्यवस्था करण्याची मागणी शेतकर्‍याने गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून केली आहे.

मसला खुर्द येथील सरोजा  केदारी गंधुरे यांची विहरी 2022-2023 मार्च मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत मंजुर झाली. विहीर काम कर्ज काढुन पुर्ण केले. सहा मस्टर दाखल करुन ही एकही पैस अद्याप दिला नाही. त्यामुळे ज्याचाकडून पैसे घेतले ते सतत तगादा लावात आहेत. शेतकर्‍याचे  बिल मागणी येण्यासाठी पंचायत समितीत सातत्याने येवुन त्याचा पायाचा चप्पल झिझल्या तरीही तांत्रिक कारण सांगुन त्याला सातत्याने परत पाठवले जात. हे तांत्रिक कारण काय हे काही शेतकर्‍यांना कळेनासे झाले आहे. माझी अर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होवुन मी प्रचंड अर्थिक अडचणीत सापडलो आहे. तरी सहानुभूतीने माझे बिल तात्काळ देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.


पुर्वीचे गटविकास अधिकारी बदलले शेतकरी अडकले !

पुर्वीच्या गटविकास अधिकारी काळात विहरी मंजुरी ते पेमेंट अदा करण्यापर्यत गुत्ता पध्दत अस्तित्वात होते. यात रोजगार सेवक महत्त्वाची भूमिका पार पाडत होता  अशी चर्चा असून,  पेमेंट देण्यापर्यत एक विशिष्ट यंञणा कार्यान्वित होते. कुठलाही अडथळा येत नव्हता. त्यामुळेच पुर्वीचे गटविकास अधिकारी यांची बदली होताच कर्मचार्‍यांनी त्यांच्यावर गुलाब पुष्प वृष्टी करुन भव्य दिव्य कार्यक्रम घेवुन निरोप दिला. ते जाताच नियमाप्रमाणे विहर मंजुरी व बिल अदा करणे  पध्दत सुरु होताच यात हा शेतकरी सापडला. आत रोजगार सेवकाकडे बिलाचा तगदा लावला असता थांबा देतो म्हणतोय  

त्यामुळे पुर्वीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामे मस्टर यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.


 
Top