धाराशिव (प्रतिनिधी)-बेसबॉल इंटरनॅशनल खेळाडू व भारताची कर्णधार रेश्मा पुणेकर हिचा पुणे येथे उमरगा तालुका येथील डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी यशवंतराव होळकर यांची प्रतिमा देवून सत्कार केला.
यावेळी रेश्मा पुणेकर हिने महाराज यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेमुळे पुढील वाटचालीसाठी जिंकण्याची प्रेरणा मिळाली असे मत व्य्नत केले. तर धनगर समाजातील या गुणी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार व कौतुक केल्याबद्दल आनंद वाटतो असे मत डॉ. स्नेह सोनकाटे यांनी व्य्नत केले.