धाराशिव (प्रतिनिधी) - कामगार कल्याण भवन, सुविधा हॉस्पिटल व स्वतंत्र मजूर कामगार संघटनेच्यावतीने इमारत व इतर बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात 200 रुग्णांची मोफत तपासणी दि. 01 जुलै रोजी करण्यात आली. 

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे सुविधा हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. स्वप्निल यादव हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आनंद भालेराव, पुष्पकांत माळाले, सामाजिक कार्यकर्ते अमोल धाकतोडे आदी उपस्थित होते. यावेळी जनरल सर्जन डॉ बालाजी समुद्रे, डॉ सोनी पिस्के, डॉ वैष्णवी जाधव, जनसंपर्क अधिकारी रवी काटकर, रेखा राठोड, योगिता दूधभाते, संतोष धावणे, तुषार नागरे, ओम मोरे यांनी तपासणी केली. यामध्ये ईसीजी, बीपी, शुगर व सर्व आजाराची तपासणी करुन औषधांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिदा सय्यद यांनी तर आभार केंद्र प्रमुख उमेश जगदाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गफार काझी, संतोष पाटील, अशोक धाकतोडे, मनीषा भडंगे, रेश्मा काझी यांनी परिश्रम घेतले.


 
Top