धाराशिव (प्रतिनिधी)-मोदी @9 अभियानाअंतर्गत बुद्धिजीवी प्रकोष्ठ आयोजित बुद्धिवंतांचे संमेलन हा कार्यक्रम धाराशिव शहरातील समर्थ हॉल मध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ भाजप नेते व महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड.मिलिंद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अनिल काळे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात केलेल्या सुधारणा, विकास, धोरणे, तसेच या विकासातून सामान्य माणसाचे झालेले सुखकर आयुष्य. आरोग्य ते संरक्षण या क्षेत्रात मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा वक्त्यांनी आपल्या भाषणातून घेतला. या कार्यक्रमाचे संयोजक प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.व्यंकटराव गुंड पाडोळीकर यांनी प्रास्ताविक केले. अॅड.शरद गुंड यांनी सूत्र संचालन केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, अभियंता, शिक्षक, विधीज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील बुद्धिवंत उपस्थित होते.