तुळजापूर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान आरंभ श्री काळभैरव मंदिर सोनारी येथुन 26 जुलै रोजी होवुन याचा सांगता स्वाभीमानीशेतकरीसंघटना संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा राजु शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आँगस्ट रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे होणार असल्याची माहीती स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे दिली
जिल्हा अभियान कार्यक्रम पुढील प्रमाणे- परंडा तालुका बुधवार दि. 26 जुलै रोजी सकाळी दहा वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर सोनारी येथे श्रीफळ फोडून अभियानास सुरुवात होणार आहे. राञी आठ ते नऊ मौजे कुंबेफळ, नऊ ते दहा मौजे साकत येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच भूम तालुका गुरुवार दि. 27 जुलै, वाशी तालुका शुक्रवार दि. 28 जुलै, कळंब तालुका शनिवार दि. 29 जुलै. धाराशिव तालुका रविवार दि.30 जुलै लोहारा तालुका सोमवार दि. 31 जुलै, उमरगा तालुका मंगळवार दि. 01 ऑगस्ट तर तर्थक्षेञ तुळजापूर येथे बुधवार दि. 02 ऑगस्ट रोजी अभियानाची सांगता स्वाभीमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी युवती प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे, गजाजन बंगाळे पार्टील, किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, तानाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पंदे, जिल्हा संपर्कप्रमुख ईश्वर गायकवाड अदि उपस्थितीत राहणार आहेत. तरी जिल्हयावासियांनी या अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रविद्र इंगळे यांनी केले आहे.
