नळदुर्ग (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झालेल्या नळदुर्ग शहरातील लाभार्थ्यांना सोलापुर जिल्ह्यातील एका बांधकाम ठेकेदाराने कमी पैशात घर बांधुन देण्याचे अमिष दाखवुन लाखो रुपयांना गंडविले असल्याचे उघड झाले असुन आज अनेक गरीब लाभार्थी तो ठेकेदार कधी येणार व कधी एकदा आपल्या घराचे बांधकाम पुर्ण होईल याची वाट पाहत बसले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्यांना राहायला घर नाही अशा गरीबांना त्यांच्या हक्काचे मजबुत व सर्व सोईनियुक्त असे घर उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना शासन  लाख  हजार रुपये घर बांधण्यासाठी देत आहे. नळदुर्ग शहरातील शेकडो नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झाले आहेत. सोलापुर जिल्ह्यांतील एक बांधकाम ठेकेदार कांही महिन्यांपुर्वी नळदुर्ग शहरात येऊन नगरपालिकेतुन घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थ्यांची यादी घेऊन त्याने प्रत्येक्ष त्या लाभार्थ्यांची भेट घेऊन संबंधित लाभार्थ्यांना इतक्या पैशात तुम्हाला घर बांधुन देतो तुम्ही तुमच्या घर बांधणीचे काम मला द्या असे सांगितले. सुरुवातीला या बांधकाम ठेकेदाराने दोन, तीन घरांचे बांधकाम वेगात सुरू केले त्यामुळे शहरांतील अनेकांनी या बांधकाम ठेकेदाराला घर बांधण्याचे काम दिले. जवळपास 30 पेक्षा जास्त घर बांधण्याचे काम या ठेकेदाराला मिळाले आहे. 

लाभार्थ्यांकडुन त्याने दोन ते तीन लाख रुपये उचलले आहेत. आज या बांधकाम ठेकेदाराच्या प्रतापामुळे शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुर झालेले घरांचे बांधकाम अर्धवट राहिले आहे.


 
Top