तुळजापूर (प्रतिनिधी)- अधिकमासास मंगळवार पासून (दि. 18) मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. हिंदू धर्मिय अधिकमासला पविञ समजत असल्याने या महिन्यात मोठ्या प्रमाणात आपआपल्या कुलदेवतेचा तिर्थक्षेञी जावुन पुजाअर्चा करुन मनोभावे दर्शन घेतात.
18 जुलै मंगळवार पासून अधिक महिना सुरू झाला आहे. तर 16 ऑगस्ट पर्यत असणार आहे. त्यानंतर श्रावण मास आरंभ होणार आहे. आधिक मास पार्श्वभूमीवर श्री. तुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अधिक मास पार्श्वभूमीवर गावोगाव विविध मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.