तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरासह तालुक्यात मंगळवार पहाटे अधिक मास आरंभ झाल्या पासुन जी पावसाने संततधार सुरु केली ती राञीपर्यत चालु होती. या झालेल्या मुर स्वरुपाचा पावसामुळे जमिनीत पाणी मुरुन त्याचा फायदा बोअर, विहरी यांच्या पाणीसाठ्यात वाढ होवुन होणार आहे.
या पावसामुळे पेरणी झालेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.