तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे रोडरोमिओचा सुळसुळाट वाढल्याने साविञीच्या लेकिचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने या रोडरोमिओचा  बंदोबस्त करण्याची मागणी  रविद्र सांळुके यांनी तहसिलदार यांना निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरासह ग्रामीण भागातील मुली आपल्या शाळा, कॉंलेज, क्लासेसला  शिक्षणासाठी जात असताना या मार्गावर रोडरोमिओ शालेय विध्यार्थींनी दिसताच हॉंर्न वाजविणे, कट मारणे, माकड चाळे करणे अशा माध्यमातून शालेय विध्यार्थींनीना रोडरोमिओचा ञास वाढला आहे.सध्या विध्यार्थींनी रोडरोमिओचा ञास घरी सांगावा तर शिक्षण बंद या भितीने भितीचा वातावरणात शिक्षण घेत आहेत. तरी रोडरोमिओचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात केली आहे. तसेच गोलाई ते जुने बसस्थानक ते नवीन बसस्थानक या अवैध वाहने.  मार्गावरील अतिक्रमणीत दुकाने.  फेरीवाले यांच्यामुळे या मार्गावरुन जाताना शालेय मुलीना जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागत आहे. तसेच 

.मुलीचा छेडछाड प्रकरणात सामाजिक, राजकिय मंडळी पोलिसांनवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने या दबावाला न जुमानता पोलिसांनी रोडरोमिओचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात केली आहे.


 
Top