धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्र सेविका समिती धाराशिवच्या तेजश्री या हस्त लिखीत अंकाचा प्रकाशन सोहळा डॉ. महेश कानडे व श्रीमती कमलताई नलावडे यांच्या हस्ते मुक्तांगण शाळेमध्ये संपन्न झाला.
हस्तलिखिताचा मुख्य विषय ‘‘ऋजचज अस्तित्वाचे भय’‘ हा आहे. याप्रसंगी बोलताना डॉ. महेश कानडे म्हणाले की, मी इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून सतत अस्वस्थ असणं इतरांशी सतत तुलना करणे एक मानसिक व्याधी आहे. हा प्रकार सोशल मीडियामुळे (व्हॉट्स अॅप, फेस बुक व इतर माध्यम) यामुळे जास्त वाढीस लागत आहे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा असे सांगितले. या विषयावर तयार केलेल्या पुस्तकातील चित्र, लेख आणि विविध साहित्य अश्या प्रकारातून केलेल्या कलाकृतीचा ही त्यांनी कौतुक केले. या हस्तलिखितात अनेक अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असुन मुखपृष्ठ व अंतरंग सजावट श्रीमती अलका हंप्रास यांनी केले.
यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या आधिकरी व सेविका उपस्थित होत्या.