धाराशिव (प्रतिनिधी)- जि. प. माजी उपाध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव तालु्नयातील घाटंग्री येथे दि. 30 जुलै  रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

रविवार दि. 30 जुलै रोजी घाटंग्री ता. जि.धाराशिव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 810 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 90 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीरात प्रमुख पाहुणे सरपंच रणजित शिंदे, मा. सरपंच व गटप्रमुख अनिल शिंदे, ग्रा.प. सदस्य. उत्तम पवार, ग्रा. प. सदस्य राजेंद्र आडसुळ, तंटामुक्ती उपध्यक्ष हणुमंत थोरात, व्हाईस चेअरमन, भिमराव शिंदे, सौदगर गोपाने, सुरेश अंकुश, दत्तु देडे,  शंकर विभुते, शिवाजी विभुते, अच्युत शिंदे, विश्वस नाईकवाडी, सुनिल थोरात, लहु अंकुश, इत्यादी उपस्थित होते. तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.  यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ अजय घुगे, डॉ. अनिकेत सुतार, डॉ.विजय बोराडे, डॉ.दिपक चौरे, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, योगेश मारवडकर, आशा कार्यकर्त्या व घाटंग्री उपकेंद्राच्या आशा कार्यकर्त्या अश्विनी अंकुश, काशीबाई सुरवसे यांनी परिश्रम घेतले.

 
Top