परंडा (प्रतिनिधी) -भारतीय जनता पार्टी, धाराशिवच्या जिल्हाध्यक्षपदी संताजी चालुक्य-पाटील यांची निवड झाल्याबद्दल माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अनिल काळे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, अॅड. गणेश खरसडे, सतिश देशमुख, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, जेष्ठ नेते राजभाऊ चौधरी, अॅड. संतोष सुर्यवंशी, अॅड. जहीर चौधरी, अॅड. तानाजी वाघमारे, हनुमंत पाटील, शिवाजी पाटील, अॅड. भालचंद्र औसरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, अरविंद रगडे, इसुब पठाण, अजित काकडे, समीर पठाण, धनंजय काळे, संकेतसिंह ठाकूर, रामकृष्ण घोडके, मनोज पवार, गौरव पाटील, सिध्दीक हन्नुरे, धनाजी गायकवाड, शरद कोळी् तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
