धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलचा सारंग पोपट बेलदार राज्य गुणवत्ता यादीत 13 व्या स्थानी तर एकूण 38 विदयार्थी शिष्यवृत्तीधारक हायस्कूलने यंदाही स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तब्बल विदयार्थ्यांना राज्य सरकारातर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती प्रदान होणार आहे.
इ. 8 वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत विदयार्थी शिष्यवृत्ती धारक झाले तर सारंग पोपटराव बेलदार हा राज्यात 13 वा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक त्याने पटकावला.
इ. 5 वीचे तब्बल 13 विदयार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून मनस्वी महेश इंगळे हिने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे व पर्यवेक्षक डी. ए. देशमुख व टी.पी.शेटे यांचे अभिनंदन संस्थेच्यावतीने संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, सचिव सौ. प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य एस. के. घार्गे, उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी, पर्यवेक्षक वाय. के. इंगळे, एन.एन. गोरे, के.वाय. गायकवाड, जाधव आर. बी, एस.जी. कोरडे, सौ. बी. बी. गुंड यांनी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.