तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हापरिषद प्रशालेतील ईस्ञोमार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल अंजली सरडे हिचा सत्कार करण्यात आला.
तसेच याच कार्यक्रमात दहावीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार करुन सहशिक्षक जमादार यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ यावेळी पार पडला. यावेळी दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या प्रियांका लबडे, द्वितीय दिव्या शिनगारे, तृतीय साक्षी हालकुडे या विद्यार्थ्यांचा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक परीक्षेत विशाखा डोंगरे, गौसिया फकीर, वैष्णवी तेलंग, सत्यम साठे, सचिन गाटे याही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य गोविंद डोंगरे, अदमशह फकीर, आपासाहेब जेटिथोर, सत्यवान लबडे, अभियंता सोमनाथ शिरगिरेसुदर्शन शिनगारे, पप्पू सरडे, महेश डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राठोड यांनी. तर सूत्रसंचालन राऊत यांनी केले. तर गोविंद डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सरडे मॅडम, तनपुरे, फुगारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक व विद्यार्थी उपस्थिती होती.