उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा व लोहारा तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांचा समावेश असलेल्या 10 रस्त्यांच्या कामांसाठी जुलै 2023-24 च्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्या अंतर्गत 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
उमरगा व लोहारा तालुक्यातील 10 रस्त्यांच्या कामांसाठी जुलै 2023-24 च्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यामध्ये 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये गुंजोटी भुसणी मुरूम आष्टा का. रस्ता रामा 240 रस्त्यावरील (भाग-आचार्य तांडा ते आष्टा कासार) रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी रुपये, उमरगा चौरस्ता - कसगी ते राज्य सरहद्द रस्ता रामा 239 वरील (भाग-कसगी ते राज्य सरहद्द) ची सुधारणा करणे 5 कोटी 50 लक्ष रुपये, औसा गुबाळ सास्तूर उदतपुर सालेगाव मुरूम रस्ता रा.मा. 242 (भाग-जिल्हा सरहद्द ते सास्तूर ) ची सुधारणा करणे 1 कोटी 40 लक्ष रुपये, औसा गुबाळ सास्तूर उदतपुर सालेगाव मुरूम रस्ता रा.मा. 242 (भाग-तावशीगड ते सालेगाव) ची सुधारणा करणे 1 कोटी 50 लक्ष रुपये, तुरोरी आष्टा ज. मळगीवाडी दगडधानोरा रस्ता प्रजिमा 49 वरील (भाग- मळगीवाडी ते दगडधानोरा) ची सुधारणा व रुंदीकरण करणे 1 कोटी रुपये, उमरगा बेडगा डिग्गी रस्ता प्रजिमा- 51 (भाग-बेडगा गावाजवळ व डिग्गी ते राज्य सरहद्द) रस्त्याची सुधारणा करणे 5 कोटी रुपये, भातागळी कास्ती नागूर खेड ते धानुरी रस्ता प्रजिमा 43 (भाग-नागूर ते जुने खेड) व (भाग-जुने खेड ते खेड) ची सुधारणा करणे 4 कोटी रुपये, लोहारा मोघा बु. ते वडगाववाडी वडगाव फनेपूर रुद्रवाडी येणेगुर रस्ता प्रजीमा -64 रस्ता (भाग- मोघा बु. ते वडगाववाडी) ची सुधारणा करणे 2 कोटी 10 लक्ष रुपये, प्रजिमा 51 ते मोघा पश्चिम रस्त्याची सुधारणा करणे 1 कोटी रुपये, हराळी तोरंबा कलदेव निंबाळा समुद्राळ ते होळी प्रजिमा-44 (भाग-तालुका सरहद्द ते होळी) ची सुधारणा करणे 150 लक्ष रुपये या रस्त्यांचा यात समावेश आहे.
