धाराशिव (प्रतिनिधी)- गुन्हेगारी जमात म्हणून ओळखल्या जाणार्या आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणुन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयातील अंलकार हॉल येथे आज दि.24.06.2023 रोजी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उस्मानाबाद पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पारधी समाज बांधवाचा मोठा प्रतिसाद मिळाला.
पारधी समाजातील व्यक्ती गुन्हेगारीकडे कोणत्या कारणामुळे वळाल्या, त्यांची कौटुंबिक पार्श्वभुमी, शिक्षण आणि त्यांचा आर्थिक पुनर्वसनासाठी शासनाच्या योजनांमार्फत कोणत्या उपाययोजना करता येतील, याची पाहणी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
या कार्यक्रमात पारधी समाजाची गुन्हेगारी पार्श्वभुमी,सद्यस्थितीत ते करीत असलेले काम, भविष्यात कोणते काम किंवा नोकरी करण्याची इच्छा आहे अशी विविध विषयानवर प्रश्नावली फॉर्म भरुन घेण्यात आली. तसेच आरोग्याविषयक समस्यांबाबतीत देखील प्रश्नावली तयार करुन ती माहिती भरुन घेण्यात आली. तसचे पारधी समाजातील 76 व्यक्तीची, शुगर व इतर आरोग्य विषयक समस्याबाबत वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
तसेच शासनाच्या राष्ट्रीय रोजगार योजणे मधून काम मिळवून देण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले. व त्यांना शेळी पालन, कुकूट पालन व इतर व्यावसाया बाबत मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक,उस्मानाबाद व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास उस्मानाबाद पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, पोलीस उप अधीक्षक स्वप्नील राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस निर्रीक्षक पारेकर आनंदनगर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक उस्माना शेख उस्मानाबाद शहर तसेच जिल्हा शासकिय रुग्नालय उस्मानाबाद येथील डॉ. मेंडेकर, डॉ. विक्रांत राठोड, अमृत कुभांर, विश्वजीत जगदाळे, परमेश्वर मुळे, खट्टींग सरस्वती, सुहास शिंदे, बलराम पोतदार, नारायनकर, फार्मासिस्ट सोनटक्के, अॅड. रेणुका शेटे, टाटा इनस्टिट्युट ऑफ सोशल सायन्स, तुळजापूर येथील विद्यार्थी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथील अधिकारी अंमलदार व पारधी समाजातील एकुण 150 ते 200 व्यक्ती उपस्थितीत होते.