धाराशिव (प्रतिनिधी)-राजर्षी शाहू महाराज यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बशीर तांबोळी, उपक्रमशील शिक्षिका क्रांती मते यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत शाहू महाराज एक आदर्श समाजवादी, समतावादी व दिनदलितांचे राजे होते. तसेच त्यांनी स्त्री शिक्षण, बालविवाह प्रथा बंद करणे, विधवा विवाहला चालना देणे,स्त्री पुरुष समानता, दलितांच्या उन्नती करता विशेष कार्यक्रम करणे असे अनेक समाज समानतेचे उपक्रम राबविले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सत्यशिला म्हेत्रे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती सुनीता कराड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम केले.


 
Top