कळंब (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांचा कडता बंद करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सभापती शिवाजी कापसे व उपसभापती श्रीधर बाबा भवर यांचा शेतकरी वर्गाकडून जाहीर सत्कार करण्यात आला. 

कृषि उत्पन्न बाजार समिती कळंबचे संचालक मंडळ कार्यरत होवून एक महिना पूर्ण होण्यापूर्वीच  सभापती शिवाजी कापसे यांनी शेतकर्‍यांचे हितासाठी बाजार समितीत सर्व व्यापारी बांधवांना बोलावून घेवून शेतकर्‍यांच्या दोन किलो कडता बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. व्यापार्‍यांनी बाजार समितीत शेतमाल घेवून येणार्‍या शेतकर्‍यांना दोन किलो कडता घेवू नये असे सुचविले होते. त्यास व्यापारी वर्गाने सहमती दर्शविल्याने बाजार समितीत शेतमाल घेवून येणार्‍या शेतकर्‍यांकडून घेतला जाणारा कडता कमी झाला आहे. यातून शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सभापती व उपसभापती तसेच संचालक मंडळाने शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. 

शेतकर्‍यांसाठी काम करणारा शेतकर्‍याचा मुलगा सभापती झाल्याने शेतकरी वर्गाने बाजार समितीत येवून सभापती कापसे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून फटाके वाजवून सत्कार केला. यावेळी  शेतकरी हनुमंत मुळीक, विकास शिंदे, माऊली वावरे, बलभिम चव्हाण, प्रकाश कदम, शामराव नरवडे, गोकुळ शेळके, तानाजी कदम, अर्जूण शिंदे, संजय होळे, राजेंद्र कोल्हे, दिलीपराव पाटील, राजाभाऊ केंद्र, पंढरीनाथ सांगळे, सचिन शेंडगे, हमाल युनियनचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ यादव, हमाल मापाडी संचालक शिवाजी आडसुळ, व सर्व संचालक तसेच सचिव दत्तात्रय वाघ उपस्थित होते.


 
Top